J. P. Nadda Nagpur : जे पी नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द

J. P. Nadda Nagpur : जे पी नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द

नागपुरात आज भाजपचं नमो युवा राष्ट्रीय संमेलन पार पडणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

नागपुरात आज भाजपचं नमो युवा राष्ट्रीय संमेलन पार पडणार आहे. जेपी नड्डा या संमेलनात सहभागी होणार होते तसेच संमेलनात जेपी नड्डा युवकांना मार्गदर्शन करणार होते मात्र आता जेपी नड्डा यांचा नागपूर दौरा रद्द झाला आहे.

नड्डा यांच्यांऐवजी आता स्मृती इराणी संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरीही उपस्थित राहणार आहेत. महासंमेलनाला एक लाख युवक सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजप युवा मोर्चाकडून महासंमेलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com