दीड तास व्हिडिओ रेकॉर्ड करून पत्नी आणि न्यायव्यवस्थेवर आरोप करत पतीने संपवलं जीवन...
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सध्या हॅशटॅग मेन टू ट्रेंडिंग होत आहे. मेन टू हॅशटॅगचा अर्थ पुरूषांना सुद्धा भोगावं लागतंय. पुरूष सुद्धा घरगुती मानसिक अत्याचाराचे बळी पडतात असा आहे. हा हॅशटॅग ट्रेंडिग का होत आहे, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा एका बंगळुरू स्थित उच्चशिक्षित पतीने दीड तास व्हिडीओ रेकॉर्ड करत आपली करूण कहाणी सांगत आपलं जीवन संपवलं आहे.
एक्सवर शेअर केलं गेलेल्या ट्वीटच्या आधारे हे कळतंय की, बंगळुरू येथील 34 वर्षीय अतुल सुभाष या तरूणाने आपलं जीवन संपवलं आहे. त्याच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अतुल सुभाष हे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते. त्याची पत्नी सुद्धा एका प्रसिद्ध आयटी कंपनीमध्ये नोकरी करते.
नेमकं काय घडलं?
अतुल आणि त्याची पत्नी यांच्यातील वैवाहिक चांगले संबंध नव्हते. जौनपूर फॅमिली कोर्टात त्यांचं घटस्फोटाचं प्रकरण प्रलंबित होतं. त्यांच्या पत्नीने अतुलवर घरगुती हिंसाचाराविरोधात केस दाखल केली होती. एक्सवर शेअर केलेल्या पोस्टनुसार अतुल पत्नीला पोटगी म्हणून ४० हजार दरमहा रक्कम देत होता. मात्र, तरीही आणखी २-४ लाख अतिरिक्त पैशाची मागणी पत्नीने केली असल्याचं सांगितलं जात आहे.
दीड तासांच्या व्हिडिओमध्ये काय म्हणला अतुल?
अतुलने आपले जीवन संपवण्याआधी एक दीड तासाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपली करूण कहाणी सांगितली आहे. तसेच २४ पानांच्या कागदपत्रांमध्ये आपल्या मृत्यू जबाबदार कोण याविषयी त्याने पुरावे जोडले आहेत. तर व्हिडिओमध्ये आपणास पत्नी आणि न्यायाधीशाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं त्याने म्हटलं आहे. पत्नी आणि सासरच्या मंडळीने खोट्या केसेस दाखल करत आपल्याला अडकवून मानसिक छळ केल्याचं त्याचं म्हणणं आहे.
अतुल व्हिडीओमध्ये म्हणत आहे की, “मैं होश में हूं और अपनी मर्जी से यह उठा रहा हूं।”. तसेच त्यांनी पोस्टमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीओला एलॉन मस्क यांना टॅग करत भारताच्या न्याय प्रणालीवर अविश्वास व्यक्त केला आहे. असं सांगितलं जात आहे, मात्र, तशी कोणतीही पोस्ट आमच्या निदर्शनास आली नाही. सोशल मीडियावर #JusticeForAtulSubhash ट्रेन्ड करत आहे. एक्स युजर्स अतुलसाठी न्याय मागत आहेत.
लेखिका आणि सोशल मीडिया एक्सपर्ट शेफाली वैद्य यांनी वरील घटनेबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणतात की, एखाद्या व्यक्तीने आपले जीवन संपवण्याआधी सांगितलेल्या कहाणीवर शंका घेण्याचं कोणतही कारण नाहीये. अतुल सुभाष यांचा भ्रष्ट व्यवस्था आणि त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारी लोभी पत्नीने त्यांना जीवन संपवण्यास भाग पाडले. मात्र, घडलेल्या प्रकारानंतरही न्यायाधीशाची नोकरी जाणार नाही किंवा पत्नीलाही शिक्षा होणार नाही, कारण आपले कायदे एकतर्फी आहेत!
(डिसक्लेमर: सदर घटनेबाबत अधिकृत अशी कोणतीही माहिती मिळू शकली नाही. एक्सवर ट्रेंड होत असलेल्या पोस्टच्या हवाल्याने वरील बातमी लिहिण्यात आली आहे. बातमीतील तपशीलांच्या सत्यता पडताळणीचा लोकशाही मराठी कोणताही दावा करत नाही.)