Literary conference
Literary conferenceTeam Lokshahi

वर्ध्यात होणाऱ्या 96 व्या साहित्य संमेलन अध्यक्षपदी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड

वर्ध्यात स्वावलंबी शाळेच्या मैदानावर 3,4,5 फेब्रुवारी 23 ला साहित्य संमेलन होत आहे
Published by :
Sagar Pradhan

भूपेश बारंगे|वर्धा: स्वावलंबी शाळेच्या मैदानावर फेब्रुवारी महिण्यात होऊ घातलेल्या नियोजित 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली. याबाबत अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी आज वर्धा येथे पत्रकार परिषदेत घोषणा केली.

विदर्भ साहित्य संघाचे यंदा शताब्दी वर्ष असल्यामुळे मराठी साहित्य संमेलन विदर्भात व्हावे अशी मागणी होत होती. सेवानिवृत्त न्यायमूर्ती आणि प्रसिद्ध विचारवंत लेखक नरेंद्र चपळगावकर हे अभ्यासपूर्ण व तर्कशुद्ध मांडणी करण्यासाठी प्रसिद्ध वक्ते असून त्यांनी चरित्र आत्मचरित्र, भारतीय स्वतंत्र लढा ते हैद्राबाद मुक्ती संग्रामी या संदर्भात महत्व पूर्ण लेखन केले आहे.चित्र दाखवणार आहे दर्शन घडवणार आहे. इतिहासाचा धागा वर्तमानशी जोडताना त्यांनी विचारदृष्टि दिली आहे ती मोलाची आहे. बरोबरच विविध संस्थांचे पुरस्कारही त्यांना मिळालेले असून अनेक संस्थांवर त्यांनी काम केले आहे.त्याची 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड जाहीर करताना अखिल भारतीय साहित्य महामंडळाला अतिशय आनंद होत आहे.असे तांबे यांनी सांगितले.

वर्ध्यात स्वावलंबी शाळेच्या मैदानावर 3,4,5 फेब्रुवारी 23 ला साहित्य संमेलन होत आहे. मान्यवर लेखक आणि प्रकाशक यांचा सत्कार जाईल.महत्वाच्या पुस्तकांवर चर्चा घडवून आणणार आहे. स्त्री पुरुष तुलना, ताराबाई शिंदे यांच्या पुस्तकावर चर्चा होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com