'सुशांत सिंह राजपूतला न्याय द्या', मुंबई पालिकेच्या आवारात झळकले फलक

'सुशांत सिंह राजपूतला न्याय द्या', मुंबई पालिकेच्या आवारात झळकले फलक

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या विषयावरून जुंपलेली असताना त्यातच आज 1 जुलैला ठाकरे गट मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार आहे. आदित्य ठाकरेंच्या मोर्चा आधीच वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या आवारात 'सुशांत सिंह राजपूतला न्याय द्या', अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत.आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत असं देखील या बॅनरवर छापण्यात आलं आहे. सुशांत सिंह राजपूतसोबतच दिशा सालियानलाही न्याय द्या. असे देखिल बॅनर छापले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com