Kangana Ranaut
Kangana Ranaut

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर कंगना रणौतची मोठी प्रतिक्रिया, म्हणाली, "भाजपचे प्रमुख..."

बॉलिवूड सिनेमांमध्ये अष्टपैलू अभिनय करणारी कंगना रणौत आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
Published by :

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी हिमाचल प्रदेशच्या मंडीतून अभिनेत्री कंगना रणौतला उमेदवारी दिली. बॉलिवूड सिनेमांमध्ये अष्टपैलू अभिनय करणारी कंगना आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. उमेदवारी घोषित झाल्यानंतर कंगनाने माध्यमांशी संवाद साधून मोठी प्रतिक्रिया दिली. "ही माझी 'जन्मभूमी' आहे आणि माझ्या जन्मभूमीने मला पुन्हा बोलावलं आहे. मी भाग्यवान आहे. त्यांनी माझी निवड केली आहे, तर मी त्यांची सेवा करेन. मी भारावून गेली आहे, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी हा भावनिक दिवस आहे. मी भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांचे मनापासून आभार व्यक्त करते. तसंच माझ्याकडून सर्वांना होळीच्या शुभेच्छा..असं कंगना म्हणाली आहे.

भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर कंगना रणौतने ट्वीट करत म्हटलं होतं, "भारतीय जनता पक्षाने मला नेहमीच सहकार्य केलं आहे. भाजपच्या राष्ट्रीय समितीकडून मला लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. माझे जन्मस्थान हिमचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून मी लोकसभा निवडणूक लढणार आहे. भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश झाल्यामुळं मला आनंद झाला आहे. माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. जनतेच्या सेवेसाठी आणि एक उत्तम कार्यकर्ता बनवण्यासाठी मी प्रयत्न करेन. धन्यवाद."

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी काल रविवारी पाचवी यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्राच्या तीन उमेदवारांचा समावेश आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघातून राम सातपुते, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातून खासदार अशोक नेते यांना पुन्हा संधी देण्यात आलीय. तसंच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी खासदार सुनील मेंढे यांनाही पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. तर मेरठमधून अरुण गोवील आणि सुलतानपूरमधून मनेका गांधी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com