दुष्कर्म केल्यावर स्वर्गातून खाली पडतात, मग हा तर फक्त एक नेता आहे; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौतची सडकून टीका
Admin

दुष्कर्म केल्यावर स्वर्गातून खाली पडतात, मग हा तर फक्त एक नेता आहे; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौतची सडकून टीका

निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांना विजय झाला आहे.

निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांना विजय झाला आहे. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? यावर शिंदे-ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 17 जानेवारी रोजी निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाचे दावे फेटाळून लावले होते. यावेळी 23 जानेवारीला दोन्ही गटांना लेखी स्वरुपात उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिला होते. यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का देत धनुष्यबाण व शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे.

याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रणौतनेही प्रतिक्रिया दिली आहे. कंगना हिने ट्विट करुन म्हटले आहे की, देवतांचा राजा इंद्रसुद्धा दुष्कर्म केल्यावर स्वर्गातून खाली पडतात, मग हा तर फक्त एक नेता आहे, जेव्हा त्याने माझे घर अन्यायाने तोडले होते, तेव्हाच मला समजलं होतं की लवकरच त्याची सत्ता जाईल, देवता चांगल्या कर्मांनी पुन्हा वर जाऊ शकतात, परंतु स्त्रीचा अपमान करणारे लोक कधीच पुन्हा वर उठू शकत नाही, आता परत कधीच तो या परिस्थितीतून वर येऊ शकणार नाही. असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com