Kapil Sharma
ताज्या बातम्या
Kapil Sharma : कॅनडामधील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करणाऱ्या शूटरला दिल्लीतून अटक
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार करण्यात आला होता.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Kapil Sharma) प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार करण्यात आला होता. आतापर्यंत कपिल शर्माच्या कॅफेवर तीन वेळा गोळीबार झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता कॅनडामधील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करणाऱ्या शूटरला दिल्लीतून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणात आता मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अटक करण्यात आलेला आरोपी बंधू मान सिंह सेखोन हा कॅनडामधील गोळीबार घटनेतील मुख्य शूटर असल्याचं सांगितलं जात आहे.
बंधू मान सिंह सेखोन असे या शूटरचे नाव असून हा गँगस्टर गोल्डी ब्रारशी संबंधित आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचं हे एक मोठं यश मानलं जात आहे.
Summery
कॅनडामधील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार
गोळीबार करणाऱ्या शूटरला दिल्लीतून अटक
मोठे खुलास होण्याची शक्यता
