कसारा-सीएसएमटी लोकलनं घेतला पेट; जीव धोक्यात घालून प्रवाशांनी मारल्या ट्रेनमधून उड्या

कसारा-सीएसएमटी लोकलनं घेतला पेट; जीव धोक्यात घालून प्रवाशांनी मारल्या ट्रेनमधून उड्या

कसारा-सीएसएमटी लोकलनं घेतला पेट; जीव धोक्यात घालून प्रवाशांनी मारल्या ट्रेनमधून उड्या

कसारा-सीएसएमटी लोकलनं घेतला पेट घेतल्याची घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानका जवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कसारा लोकल ट्रेन मधून अचानक धूर निघू लागल्याने सदर ट्रेनला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी ट्रेन मधून उड्या मारल्या, याबाबतची माहिती राजेश घणघाव या प्रवाशाने तात्काळ आसनगाव स्टेशन मास्तर यांना दिली.

मात्र चाकरमानी प्रवाशी यांनी रेल्वे ट्रॅकमधून चालत आसनगाव स्थानक गाठत आहे, सुदैवाने कोणती ही जीवित हानी झाली.  ब्रेकमध्ये घर्षण झाल्याने लोकलच्या चाकाला आग लागल्याचे समोर आले. त्यामुळे स्थानकावर एकच गोंधळ उडाला.

15 ते 20 मिनिटांनंतर पुन्हा ही ट्रेन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे रवाना करण्यात आली. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com