पुणे कसबा पेठ, पिंपरी चिंचवडमधील भाजपाचे उमेदवार जाहीर

पुणे कसबा पेठ, पिंपरी चिंचवडमधील भाजपाचे उमेदवार जाहीर

पुण्यातील पिंपरी चिंचवड व कसबा विधानसभेची पोटनिवडणूक २६ फेब्रवारी रोजी होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुण्यातील पिंपरी चिंचवड व कसबा विधानसभेची पोटनिवडणूक २६ फेब्रवारी रोजी होणार आहे. कसबा पेठमध्ये हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.भाजपने उमेदवार जाहीर केले आहे. कसबा मतदार संघातून टिळक यांच्या परिवाराला उमेदवारी दिली नाही तर पिंपरी चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातून उमेदवारी दिली आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, टिळक कुटुंबीयांशी चर्चा करुन कसबा पेठेतील उमेदवार ठरवले आहेत. तसेच कुणाल टिळक यांच्यांवर नवीन जबाबदारी देण्यात आली असल्याचे देखिल त्यांनी सांगितले. गेल्या महिन्यात भाजपचे प्रदेश प्रवक्त्यांची यादी जाहीर झाली होती.भारतीय जनता पक्षाने नवीन यादीत कुणाल यांच्या नावाची भर घालून ती पुन्हा प्रसिद्ध केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com