तुझ्या सायबाने सुपारी घेतली आहे, तू फक्त मन लावून नाचायचं काम कर; पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे - राष्ट्रवादीत जुंपली

तुझ्या सायबाने सुपारी घेतली आहे, तू फक्त मन लावून नाचायचं काम कर; पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे - राष्ट्रवादीत जुंपली

पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ मतदारसंघासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या निवडणुकीसाठी मनसेने भाजपाला पाठिंबा दिला आहे. मनसेनं या निवडणुकीसाठी तटस्थ भूमिका स्वीकारली होती. मात्र कालच मनसे नेते बाबू वागस्कर यांनी सांगितले की, मनसे भाजपला पाठिंबा देणार आहे. मात्र, प्रचारात सहभागी होणार नाही. असे त्यांनी सांगितले.

मनसेने भाजपाला पाठिंबा दिल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसेच्या साईनाथ बाबरांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांवर टीका केली होती. यावर प्रशांत जगतापांनी प्रतिउत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, साईनाथ, सायबाचा उरलेला पेग चोरून पिलास का बाळा ?? शुद्धीवर ये. तुझ्या सायबाने सुपारी घेतली आहे, तू फक्त मन लावून नाचायचं काम कर. असे म्हणत त्यांनी जगतापांना प्रतिउत्तर दिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com