Mahapalika Election
Mahapalika ElectionMahapalika Election

Mahapalika Election : कल्याण-डोंबिवली निवडणुकीत महायुतीची तयारी, जागा वाटपावर चर्चा अंतिम टप्प्यात

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावर चर्चा जवळपास पूर्ण झाल्याचे संकेत मिळत असून, लवकरच यावर अंतिम घोषणा होण्याची शक्यता आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

KDMC election seat sharing Mahayuti: ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला अजून अधिकृत दुजोरा मिळण्याआधीच शिंदे गट आणि भाजपकडून महायुतीबाबत हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावर चर्चा जवळपास पूर्ण झाल्याचे संकेत मिळत असून, लवकरच यावर अंतिम घोषणा होण्याची शक्यता आहे.

केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री स्थानिक पातळीवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत युती करून निवडणूक लढण्यावर एकमत झाल्याची माहिती आहे. उर्वरित मुद्द्यांवर चर्चा सुरू असून पुढील दोन दिवसांत जागावाटपाचा निर्णय निश्चित होईल, असे सांगितले जात आहे.

या संदर्भात शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी माहिती देताना सांगितले की, दोन्ही पक्षांमध्ये समजूतदारपणे चर्चा सुरू आहे. जागा वाटपावर सकारात्मक वातावरण असून कोणताही वाद न होता निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या दोन दिवसांत महायुतीबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जर केडीएमसी निवडणुकीत महायुती एकत्र मैदानात उतरली, तर विरोधी पक्षांसाठी ही लढत कठीण ठरणार असल्याचे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. दरम्यान, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने निवडणुकीची तयारी आधीच सुरू केली आहे. प्रत्येक प्रभागाचा आढावा घेणे, इच्छुक उमेदवारांची माहिती घेणे आणि प्रचाराची दिशा ठरवणे यावर भर दिला जात आहे.

जागावाटपाचा अंतिम निर्णय झाल्यानंतर उमेदवारांची नावे जाहीर केली जातील आणि त्यानंतर प्रचाराला वेग येईल. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत महायुतीची भूमिका महत्त्वाची ठरण्याची चिन्हे आहेत.

थोडक्यात

  • ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला अजून अधिकृत दुजोरा मिळण्याआधीच शिंदे गट आणि भाजपकडून महायुतीबाबत हालचाली वेगात सुरू झाल्या आहेत.

  • कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावर चर्चा जवळपास पूर्ण झाल्याचे संकेत मिळले.

  • लवकरच यावर अंतिम घोषणा होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com