KDMC सार्वत्रिक निवडणूक 2022 : कल्याण डोंबिवलीच्या ओबीसी आरक्षणाची सोडत पडली पार

KDMC सार्वत्रिक निवडणूक 2022 : कल्याण डोंबिवलीच्या ओबीसी आरक्षणाची सोडत पडली पार

कल्याण केडीएमसी निवडणूकासाठी आज पुन्हा नव्याने आरक्षणाचा सोडत पार पडली. या सोडतीत सगळ्यात प्रथम ओबीसी उमेदवारांककरीता 35 प्रभाग आरक्षित करण्यात आले आहे. या 35 प्रभागापैकी 18 प्रभाग हे महिला ओबीसी उमेदवारांकरीता आरक्षित करण्यात आले आहेत.
Published by :
Team Lokshahi

अमझद खान, कल्याण : कल्याण केडीएमसी निवडणूकासाठी आज पुन्हा नव्याने आरक्षणाचा सोडत पार पडली. या सोडतीत सगळ्यात प्रथम ओबीसी उमेदवारांककरीता 35 प्रभाग आरक्षित करण्यात आले आहे. या 35 प्रभागापैकी 18 प्रभाग हे महिला ओबीसी उमेदवारांकरीता आरक्षित करण्यात आले आहेत.

81 खुल्या प्रवर्गातील प्रभागापैकी 40 प्रभाग हे खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरीता आरक्षित करण्यात आले असून महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे सचिव संजय जाधव यांच्या उपस्थितीत आरक्षणाची सोडत आज अत्रे रंगमंदिरात पार पडली. यावेळी सोडत पद्धतीने आरक्षण जाहिर करण्यात आले. यापूर्वी ओबीसी आरक्षणा शिवाय केवळ अनुसूचित जाती जमाती आणि खुला प्रवर्गासाठीचे आरक्षण जाहिर करण्यात आले होते. ते रद्द करुन खुल्या प्रवर्गातून ओबीसी आरक्षणासह खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांच्या आरक्षित प्रभागांची सोडत काढण्यात आली.

ओबीसीसाठी कोणत्या प्रभागात आरक्षण

१ अ, ३ अ, ८ ते १४ अ , १६ अ, १८ अ २४ अ, २६ ते ४२ अ आणि ४४ ब हे ३५ प्रभाग ओबीसी उमेदवारांककरीत आरक्षित करण्यात आले. त्यापैकी २२ ब, २ ब, ५ ब, ४४ ब, १ अ, २ ब, ३ अ, ५ ब, ८ अ, ११ अ, १२ अ, १३ अ, १८ अ, २२ ब, २७ अ, २८ अ, ३० अ, ३३ अ, ३५ अ, ३६ अ, ४० आणि ४४ ब प्रभाग ओबीसी महिला उमेदवारांकरीता आरक्षित झाले आहेत.

खुल्या प्रवर्गातील महिलासाठी आरक्षित

१ ब, ३ ब, ४ ब, ७ ब, ८ ब, ११ ब, १२ ब, १२ ब, १३ ब, १८ ब, २० ब, २३ ब, २७ ब, २८ ब, ३० ब, ३३ ब, ३५ ब, ३६ ब, ४० ब, ४४ क, ९ ब, १० ब, १४ ब, १५ ब, १६ ब, २१ ब, २४ ब, २५ ब, २७ ब, २९ ब, ३१ ब, ३२ब , ३३ ब, ३४ ब, ३५ ब, ३६ ब, ३७ ब, ३९ ब, ४० ब, ४१ ब,

खुल्या प्रवर्गातील अनारक्षित प्रभाग

१ ते ४ क, ६ ते ४० क आणि ४४ क हे प्रभाग अनारक्षित आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com