ताज्या बातम्या
Kedarnath Helicopter Crash : केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबाचा करुण अंत
केदारनाथ दुर्घटना: हेलिकॉप्टर अपघातात 7 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश.
उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये आज, रविवारी सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळले. गौरीकुंड परिसरातील त्रिजुगी नारायणजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे होते आणि ते केदारनाथ धामहून फाट्याकडे जात होते. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व 5 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. खराब हवामानामुळे हा अपघात झाला असून एनडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. यामध्ये आता अपडेट मिळत आहे.
या अपघातामध्ये महाराष्ट्रातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळमधील जयस्वाल कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाला. हे तिघे रात्री केदारनाथच्या दर्शनासाठी गेले होते. राजकुमाल जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी काशी जयस्वाल यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे यवतमाळमध्ये शोककळा पसरली आहे.