देशात पुन्हा कोरोनाचे संकट, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

देशात पुन्हा कोरोनाचे संकट, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

भारतात कोरोनाचा नवीन व्हॅरीयंट मिळाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. आरोग्य यंत्रणाकडून मॉक ड्रिल करण्यात आले.
Published by :
shweta walge

भारतात कोरोनाचा नवीन व्हॅरीयंट मिळाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. आरोग्य यंत्रणाकडून मॉक ड्रिल करण्यात आले. अधिकाऱ्यांना मास्क, ऑक्सिजन सिलिंडर, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी तयार राहण्याचे निर्देश राज्यांना दिले.

कोरोनाचा नवीन व्हॅरीयंट भारतात मिळाला आहे. तसेच कोव्हीडमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाचा सबव्हॅरीयंट JN.1 ची पहिली केस केरळमध्ये मिळाली आहे. यानंतर आरोग्य यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला. आरोग्य यंत्रणाकडून मॉक ड्रिल करण्यात आले. अधिकाऱ्यांना मास्क, ऑक्सिजन सिलिंडर, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी तयार राहण्याचे निर्देश राज्यांना दिले. यासोबतच केरळची सीमा बंद केली जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील पनूर येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. आता या घटनेनंतर, परिसरात कोविड विरूद्ध प्रतिबंधात्मक उपाय राबवण्याचे काम सुरु केले आहे. आमदार केपी मोहनन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अब्दुल्ला असे मृताचे नाव असून तो 80 वर्षांचा होता. खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com