भारतातील पहिला ट्रान्समेल प्रेग्नंट; ट्रान्सजेंडर कपलने शेअर केले PHOTO

भारतातील पहिला ट्रान्समेल प्रेग्नंट; ट्रान्सजेंडर कपलने शेअर केले PHOTO

जिया आणि जहाद या केरळमधील एका ट्रान्सजेंडर जोडप्याने सोशल मीडियावर आपल्या गर्भधारणेची घोषणा केली आहे.

जिया आणि जहाद या केरळमधील एका ट्रान्सजेंडर जोडप्याने सोशल मीडियावर आपल्या गर्भधारणेची घोषणा केली आहे. कपलने त्यांच्या इन्स्टा पोस्टवर काही फोटोही शेअर केले आहेत. कोझिकोड मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या टीमने सांगितले की, या जोडप्याला लिंग बदलाची प्रक्रिया सुरू असताना गर्भधारणेसाठी कोणत्याही शारीरिक आव्हानाचा सामना करावा लागला नाही.

जिया आणि जहाद दोघेही गेल्या ३ वर्षांपासून एकत्र राहत आहेत. जिया पुरुष म्हणून जन्माला आली असती, पण स्त्री होण्यासाठी तिने लिंग बदलाचे ऑपरेशन केले. तर जहादचा जन्म स्त्री म्हणून झाला आणि लिंग बदलानंतर पुरुष झाला. जियाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की, मी जन्माने किंवा शरिराने महिला नव्हते, माझ्यात एक स्त्री होती. तिचं स्वप्न होतं की माझंही एक बाळ असावं आणि ते मला आई म्हणावं.

आता मार्चमध्ये त्यांच्या बाळाचा जन्म होईल, अशी अपेक्षा ते करत आहेत. भारतात ट्रान्समॅनने गर्भधारणा केल्याची पहिलीच घटना असल्याचा हा दावा केला जात आहे. जहादने एका इन्स्टाग्राम पोस्टवर गर्भधारणेचे फोटो पोस्ट करुन गरोदर असल्याचा दावा केला आहे.दरम्यान, सध्या या जोडप्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. तर अनेक युजर्सने या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com