Eknath Khadse : पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी खडसेंची मोठी मागणी..., काय म्हणाले खडसे ?

पुण्यातील पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळा प्रकरणाची दोन अधिकाऱ्यांना नेलंबित करून गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भात एकनाथ खडसे यांनी जळगाव मध्ये पत्रकारांशी संपर्क साधून पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी केली आहे.

पुण्यातील पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळा प्रकरणाची दोन अधिकाऱ्यांना नेलंबित करून गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. या संदर्भात एकनाथ खडसे यांनी जळगाव मध्ये पत्रकारांशी संपर्क साधून पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी देखील मागणी केली आहे तसेच मी महसूल मंत्री असताना बिल्डर तेजवानी यांनी माझ्याशी देखील या संदर्भात संपर्क साधला होता, या सर्व प्रकरणा संदर्भातले कागदपत्र माझ्यापर्यंत आलेले आहेत, एवढेच नाही तर संगमने जमीन घोटाळा हा केलेला असून या जमीन घोटाळ्याप्रत संदर्भात पार्थ पवार वरही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी देखील मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. या सर्व प्रकरणासंदर्भात आज 11 वाजता जळगाव येथील शिवराम नगर मधील मुक्ताई बंगल्यावर आमदार एकनाथ खडसे पुन्हा पत्रकारांची संवाद साधणार आहे, व या घटने संदर्भातले असलेले सगळे कागद पुरावे पत्रकारांसमोर सादर करणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com