Khalid Ka Shivaji : 'खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदी आणा'; हिंदू महासंघ आक्रमक

‘खालिद का शिवाजी’ या आगामी चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
Published by :
Team Lokshahi

(Khalid Ka Shivaji ) ‘खालिद का शिवाजी’ या आगामी चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटावर हिंदू महासंघ आक्रमक झाले असून त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत सेन्सॉर बोर्डाला पत्र पाठवले आहे. चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली आहे. या चित्रपटामधून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने मांडली गेली असल्याचे म्हटले आहे.

या चित्रपटात खोटा इतिहास दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35 टक्के मुस्लिम होते, रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मशिद बांधली होती, आणि महाराजांचे 11 अंगरक्षक मुस्लिम होते, असे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.

'जर चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला, तर अफझल वधावर व्याख्यान देऊ,' असाही इशारा हिंदू महासंघाने दिलाय. ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्य आणि केंद्र सरकारकडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. या चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादामुळे आता फक्त सिनेसृष्टीतच नव्हे तर राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आलं आहे. आता या चित्रपटाचे भवितव्य काय ठरणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com