किंग चार्ल्स ब्रिटनचे नवीन राजे

किंग चार्ल्स ब्रिटनचे नवीन राजे

किंग चार्ल्स -3 यांचा ब्रिटनचा नवीन राजा म्हणून आज घोषित

नवी दिल्ली : राणी एलिथाबेथ यांच्या निधनानंतर ब्रिटनला नवा राजा मिळाला आहे. किंग चार्ल्स-चार्ल्स -3 हे आता ब्रिटनचे नवे राजे असणार आहेत. किंग चार्ल्स -3 यांचा ब्रिटनचा नवीन राजा म्हणून आज घोषित करण्यात आले. या कार्यक्रमात आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या आहेत.

लंडनमधील सेंट जेम्स पॅलेसमध्ये आयोजित कार्यक्रमात किंग चार्ल्स - 3 यांच्या राज्याभिषेकाशी संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यात आली. यानंतर उपस्थित नवोदितांनी त्यांना अभिवादन केले. किंग चार्ल्स -3 यांच्या पदग्रहणाने ब्रिटनमध्ये एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. ब्रिटनचे राष्ट्रगीत बदलणार असून त्यासोबत प्रिन्स ऑफ वेल्सही बदलणार आहेत. आता किंग चार्ल्स-3 राजकीय विषयांवर भाष्य करू शकणार नाही.

ब्रिटनचे नवे किंग चार्ल्स यांना यापुढे मतदार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सची गरज भासणार नाही. प्रिव्ही कौन्सिलने औपचारिकपणे किंग चार्ल्स यांना ब्रिटनचा नवा राजा घोषित केला आहे.

दरम्यान, महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर कॅथेड्रलमध्ये विशेष प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. ऑपरेशन यूनिकॉर्ननुसार महाराणी एलिझाबेथ यांचे पार्थिव तूर्तास स्कॉटलंड येथील होलीरुड निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. एलिझाबेथ यांचे पार्थिव 13 सप्टेंबर रोजी लंडन येथे नेण्यात येणार आहे. किंग चार्ल्स यांना आज महाराज म्हणून जाहीर केले तरी त्यांचा राज्याभिषेक सोहळा काही दिवसांनी आयोजित करण्यात येईल. आज होणारा कार्यक्रम हा पदग्रहण सोहळा असणार आहे. राज्याभिषेक सोहळ्यासाठी विशेष तयारी केली जाते. या सोहळ्याचे विशेष नियोजन केले जाते.

Lokshahi
www.lokshahi.com