आज रामलीला मैदानावर किसान गर्जना रॅलीचं आयोजन; ५० हजार शेतकरी होणार सहभागी

आज रामलीला मैदानावर किसान गर्जना रॅलीचं आयोजन; ५० हजार शेतकरी होणार सहभागी

आज दिल्लीत रामलीला मैदानावर किसान गर्जना रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे.

आज दिल्लीत रामलीला मैदानावर किसान गर्जना रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत ५० हजार शेतकरी होणार सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय किसान संघाचे अध्यक्ष रतन सिंह कानीवाडा यांनी सांगितलं की, चार मागण्यांसाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

यासाठी जवळपास ८०० बस आणि ४ हजार खासगी गाड्यांनी शेतकरी दाखल होणार आहेत. पिकांचं मूल्य ठरवणे, कृषी यंत्र जीएसटीमुक्त करणे, किसान सन्मान योजना बारा हजार करणे, प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहोचवणे आदी मागण्यांसाठी गर्जना रॅली आयोजित करण्यात आली आहे.

त्यामुळे वाहतूक कोंडी अडकायचं नसेल तर रामलीला मैदानाजवळून न जाण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.भारतीय किसान संघाचे अध्यक्ष रतन सिंह कानीवाडा यांनी सांगितलं की, चार मागण्यांसाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. पिकांचं मूल्य ठरवणे, कृषी यंत्र जीएसटीमुक्त करणे, किसान सन्मान योजना बारा हजार करणे, प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहोचवणे आदी मागण्यांसाठी गर्जना रॅली आयोजित करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com