Kisan Sabha Long March : शेतकरी लाँग मार्चचा चौथा दिवस; आजच्या  शिष्टमंडळाच्या बैठकीत तोडगा निघणार का?
Admin

Kisan Sabha Long March : शेतकरी लाँग मार्चचा चौथा दिवस; आजच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत तोडगा निघणार का?

शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईकडे मार्गस्थ झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईकडे मार्गस्थ झाला आहे. लाल वादळ पुन्हा एकदा मुंबईला धडक देण्यासाठी सज्ज झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा आणि इतर समविचारी संघटना यांनी हा लाँग मार्च काढला आहे.

शेतमालाला मिळत नसलेले भाव, कांदा आणि अनेक अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. लाँगमार्च मध्ये कामगार, शेतकरी सर्व सहभागी होत आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी कांदा दरावरून रस्त्यावर कांदा फेकत आंदोलनही केले जात आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत काल झालेली बैठक निष्फळ ठरली काही मुद्दे निकाली नाही निघाले म्हणून हा मोर्चा मुंबईकडे कूच करतोय. मोर्चाच्या मागण्या जर मान्य झाल्या तर आम्ही हा मोर्चा स्थगित करणार असल्याचे मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी आमदार जे पी गावित यांनी सांगितलंय.

काल(14 मार्च) दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक होणार होती मात्र ती पुढे ढकलली आहे. आणि आज (15 मार्चला) 3 वाजता बैठक होणार आहे. अशी माहिती केंद्रीय सहसचिव, अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी सांगितली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com