ताज्या बातम्या
Kishor Tiwari On Budget 2025 : ठाकरे गटाच्या नेत्याकडून बजेटचं स्वागत
अर्थसंकल्प २०२५ चं स्वागत करताना ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी म्हणाले, 'हा पुढील पाच वर्षांचा मिशन रोडमॅप आहे.'
अर्थसंकल्प २०२५ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी अर्थसंकल्पबद्दल लोकशाही मराठीला पहिली प्रतिक्रिया दिली आहे की, "हा अर्थसंकल्प पुढील पाच वर्षातील कार्यकाळाचा मिशन रोडमॅप आहे... भारतला कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे..."विरोध म्हणून विरोध न करता सरकारच्या बजेटचे स्वागत करत आहोत". असे ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारीनी प्रतिक्रिया दिली आहे.