Nivedita Saraf on Bihar Election
Nivedita Saraf on Bihar ElectionNivedita Saraf on Bihar Election

ज्येष्ठ अभिनेत्रींच्या 'या' वक्तव्यावरुन राजकीय क्षेत्रात खळबळ, दिलं बेधडक विधान

बिहार निवडणुकीनंतर भाजपच्या विजयावर दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी एक बेधडक विधान केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

( Nivedita Saraf on Bihar Election : ) बिहार निवडणुकीनंतर भाजपच्या विजयावर दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी एक बेधडक विधान केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका कार्यक्रमात त्यांनी स्पष्टपणे सांगितले, "होय, मी कट्टर भाजप समर्थक आहे." यावर विरोधकांनी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

निवेदिता सराफ म्हणाल्या, "आमदार संजय केळकर यांचे बिहार विजयासाठी अभिनंदन. मी भाजप समर्थक असल्याने मला या विजयाचा आनंद झाला आहे." यावर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी टीका केली, "सत्तेसमोर काही लोक लाचार असतात, तर काही लोक फॅन्स असतात. निवेदिता सराफ यांना पुरस्कार मिळाल्यानंतर हे विधान समजायला काहीच कठीण नाही."

ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आपलं मत व्यक्त करतं, "निवेदिता सराफ यांचा राजकारणाशी काय संबंध? पुरस्कार मिळवण्यासाठी गुळ लावण्याचे काम सुरू आहे." तथापि, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी निवेदिता सराफ यांच्या समर्थनात येत, "तुम्हाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. कलाकारांची राजकीय मतं त्यांच्या अधिकारात आहेत, त्यावर कोणतीही टिप्पणी होऊ नये," असं म्हटलं आहे. निवेदिता सराफ यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात एक नवा वाद उभा राहिलेला आहे, आणि विरोधक त्यांच्या विधानावर टीका करत आहेत.

थोडक्यात

  • बिहार निवडणुकीनंतर भाजपच्या विजयावर दिग्गज अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी एक बेधडक विधान केले.

  • ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

  • "आमदार संजय केळकर यांचे बिहार विजयासाठी अभिनंदन. मी भाजप समर्थक असल्याने मला या विजयाचा आनंद झाला आहे."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com