Kishori Pednekar on Mahesh Kothare : भाजप समर्थनावरुन किशोरी पेडणेकरांचा महेश कोठारेंवर घणाघात; "महेश कोठारेंची सून..."

Kishori Pednekar on Mahesh Kothare : भाजप समर्थनावरुन किशोरी पेडणेकरांचा महेश कोठारेंवर घणाघात; "महेश कोठारेंची सून..."

मागाठाणे येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी भाजपाचं कौतुक केलं आहे. त्यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

मागाठाणे येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी भाजपाचं कौतुक केलं आहे. यातच अभिनेते महेश कोठारे यांनी केलेले वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे.

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे म्हणाले की, " भाजप म्हणजे आपलं घर आहे. मी स्वत: भाजपचा भक्त आहे आणि मोदीजींचा भक्त आहे. 16 व्या वर्षाचे जे आपलं दिवाळी सेलीब्रेशन असेल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल, याची मला खात्री आहे."

या कार्यक्रमात महेश कोठारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यनंतर विरोधीपक्षातून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया यावर पडल्या आहेत. याचपार्श्वभूमिवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील महेश कोठारेंवर टीका केली आहे.

महेश कोठारे यांची सून अपघात प्रकरणात अडकली असल्यामुळेच ते अशी मुक्ताफळं उधळत आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी असा टोला लगावला आहे. आपला भाजपाला पाठिंबा असल्याचं विधान महेश कोठारेंनी एका कार्यक्रमात केलं होतं.

त्यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. महेश कोठारे यांच्या या विधानावर संपूर्ण सोशल मीडियावर आणि राजकीय चर्चेतून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. काहींनी त्यांचं समर्थन केलं, तर अनेकांनी कलाकार म्हणून राजकीय भूमिका घेणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com