KL Rahul : कर्णधार आणि उपकर्णधार अनुपस्थितीत केएल राहुलकडे टीम इंडियाची धुरा
भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान ५ सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये तिसऱ्या टेस्टदरम्यान टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा अचानकपणे केएल राहुल याच्या खांद्यावर सोपवण्यात आली. मुळात शुभमन गिल त्या टेस्ट सिरीजमध्ये आलेला असतानासुद्धा हा निर्णय टीम इंडियाकडून घेण्यात आला. काही काळासाठी कर्णधार शुभमन गिल हा मैदानाच्या बाहेर गेल्यामुळे अचानकपणे केएल राहुलला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले.
भारत आणि इंग्लंडयांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिजची मालिका सध्या चालू असून यामधील तिसरी टेस्ट मॅच लॉर्ड्सच्या मैदानावर खेळली जात आहे. या सामनादरम्यान अचानक तिसऱ्या सेशनमध्ये काही कारणास्तव कर्णधार शुभमन गिलला मैदानाबाहेर पडावे लागले. कर्णधार जर एखाद्या सामन्यात उपस्थित राहू शकला नाही किंवा काही कारणास्तव जर त्याला मैदानाबाहेर पडावे लागले तर तेव्हा अश्या परिस्थितीमध्ये उपकर्णधार टीमची धुरा सांभाळतो.
मात्र टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंतच्या हाताला दुसऱ्या सेशनमध्ये 34व्या ओव्हरमध्ये बुमराहच्या ओवरदरम्यान बॉलचा कॅच पकडताना जबरदस्त दुखापत झाली. त्यामुळे टीम इंडियाचा उपकर्णधारही तिसऱ्या सेशनला उपस्थित नव्हता. यामुळे कर्णधार आणि उपकर्णधार यांच्या अनुपस्थित टीम इंडियाचा अनुभवी विकेटकिपर आणि फलंदाज म्हणून केएल राहुल याला कर्णधार बनवले गेले. यावेळेस केएल राहुल याने फिल्डिंग विषयी विचार करून काही महत्वाचे वेगळे निर्णय घेतले.
लॉर्ड्स मैदानावर टेस्ट सामना खेळण्याचा मोठा अनुभव केएल राहुल याच्याकडे आहे. तसेच सीरिजमधील पहिल्या टेस्ट सामन्यात राहुलने दमदार शतक ठोकले होते. त्याचबरोबर तो उत्कृष्ट विकेटकिपिंगही करतो. याच कारणामुळे कर्णधार आणि उपकर्णधार उपस्थित नसताना काही काळासाठी टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल याला बनवले गेले.