Gold Rate : सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण ; जाणून घ्या
देशभरात सोन्याच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार बघायला मिळत आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी लाखांचा टप्पा पार केला. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून किंमतीमध्ये घसरण झालेली बघायला मिळाली. लाखाहून अधिक झालेल्या सोन्याच्या किमतीत 12 ते 16 मे दरम्यान मोठी घसरण झाली. तसेच 24 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याच्या किमतीत तब्बल 35,500 रुपयांची तर 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 3500 रुपयांची घसरण झाली. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणानं देशांतर्गत सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण झालेली दिसून आली.
गुड रिटर्न्सच्या अहवालानुसार, मागील आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये अधिक घसरण झाली आहे. सोन्याच्या किंमतीमध्ये 3.5 टक्केपेक्षा अधिक घट झाली आहे. तसेच चांदीच्या दरांमद्धे 1 % पर्यंत घाट झाली आहे. त्याचप्रमाणे जागतिक व्यापार तणाव कमी झाल्याने त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांमध्ये सोने चांदी खरेदीबाबत सकारात्मक परिस्थिती निर्माण झाल्याने सोने खरेदीदारांचा ओढा वाढल्याचे दिसून आले.
सध्याचा देशातील सोन्याचा भाव :
समोर आलेल्या माहितीनुसार, 17 मे रोजी 24 कॅरेट सोन्याच्या 100 ग्रॅमची किंमत 9,51,300 रुपये होती. 18 कॅरेट सोन्याच्या त्याच संख्येच्या ग्रॅमची किंमत 7,13,500 रुपये होती आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 8,72,000 रुपये होती. त्याचप्रमाणे 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 95130 रुपये नोंदवली गेली.