Most Sixes In An IPL Inning
Most Sixes In An IPL Inning

IPL 2024 : 'या' संघांनी ठोकले सर्वात जास्त षटकार, सनरायजर्स हैदराबादने मोडले सर्व विक्रम

आयपीएलमध्ये एका इनिंगमध्ये 'या' सहा संघांनी ठोकले सर्वात जास्त षटकार, जाणून घ्या सविस्तर माहिती.
Published by :

Most Sixes In An IPL Inning : आयपीएलच्या प्रत्येक हंगामात चौकार-षटकारांचा पाऊस पडत असतो. अशाच प्रकारचा धमाका यंदाच्या हंगामातही सुरु आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादचा संघ वेगळ्याच मानसिकतेनं मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतय. याच कारणामुळे एसआरएचने आयपीएल इतिहासातील अनेक मोठे विक्रम मोडले आहेत. यामध्ये एकाच इनिंगमध्ये सर्वात जास्त षटकार ठोकण्याच्या विक्रमाचाही समावेश आहे. एका इनिंगमध्ये सर्वात जास्त षटकार ठोकणाऱ्या सहा संघांबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

या सहा संघांनी आयपीएलमध्ये एका इनिंगमध्ये ठोकले सर्वात जास्त षटकार

६) मुंबई इंडियन्स (२०० षटकार) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (२०२४)

आयपीएलच्या १७ व्या हंगामाचा आठवा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी आक्रमक अंदाजात फलंदाजी करून २० षटकार ठोकण्याचा कारनामा केला होता. परंतु, मुंबईला या सामन्यात ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

५) दिल्ली कॅपिटल्स (२० षटकार) विरुद्ध गुजरात लायन्स (२०१७)

गुजरात लायन्सविरोधात २०१७ मध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने २०९ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता आणि ७ विकेट्सने सामना जिंकला होता. याच दरम्यान दिल्लीच्या इनिंगमध्ये २० षटकार ठोकण्यात आले होते. या सामन्यात रिषभ पंतने सर्वात जास्त ९ षटकार मारले होते.

४) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (२० षटकार) विरुद्ध गुजरात लायन्स, २०१६

आयपीएल २०१६ चा ४४ वा सामना आरसीबी आणि गुजरात लायन्स यांच्यात झाला होता. यामध्ये एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीने धडाकेबाज फलंदाजी केली होती. या इनिंगमध्ये आरसीबीने २० षटकार ठोकले होते.

३) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (२१ षटकार), विरुद्ध पुणे वॉरियर्स, २०१३

आयपीएल २०१३ च्या ३१ व्या सामन्यात ख्रिस गेल आणि विराट कोहलीने पुणे गोलंदाजांचा धुव्वा उडवला होता. आरसीबीने प्रथम फलंदाजी करत ५ विकेट्स गमावून २६३ धावा केल्या होत्या. आरसीबीने या इनिंगमध्ये २१ षटकार मारले होते.

२) सनरायजर्स हैदराबाद (२२ षटकार) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (२०२४)

आयपीएलच्या १७ व्या हंगामातील ३० वा सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी धमाका केला होता. आयपीएल इतिहासातील सर्वात जास्त स्कोअर करून या डावात हैदराबादने सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रमही केला. हैदराबादने एका डावात २२ षटकार मारले होते.

१) सनरायजर्स हैदराबाद (२२ षटकार) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, २०२४

सनरायजर्स हैदराबादच्या संघानं आयपीएलच्या यंदाच्या हंगामात जबरदस्त कामगिरी करून तिनवेळा २५० हून अधिक धावा केल्या. हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरोधात ७ विकेट्स गमावून २६६ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये २२ षटकारांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com