Technical Education : तंत्रशिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे? 'ही' आहेत आवश्यक कागदपत्रे

Technical Education : तंत्रशिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे? 'ही' आहेत आवश्यक कागदपत्रे

प्रवेश प्रक्रिया: तंत्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी करा, वेळेवर प्रवेश सुनिश्चित करा.
Published by :
Team Lokshahi
Published on

राज्यातील तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत पदविका आणि पदवीच्या प्रवेशांना सुरुवात झाली आहे. दरम्यान प्रवेशांसाठी कागदपत्रांची तयारी आधीपासूनच करून ठेवावी, असे तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी केले आहे. तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रम, बारावीनंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी यांसारख्या अभ्यासक्रमांसह थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र तसेच एमई/एमटेक, एमसीए, एमबीए यांसारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे (CAP) राबविण्यात येते.

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर त्यांची कागदपत्रे पडताळणीसाठी सुविधा केंद्रावर तपासली जातात. अनेकवेळा विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्याने प्रवेश घेण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांची तयारी आताच करावी, असे आवाहन संचालनालयाने परिपत्रकाद्वारे केले आहे.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :

1. जात प्रमाणपत्र

2. जात वैधता प्रमाणपत्र (पदवी अभ्यासक्रमासाठी आवश्यक

3. नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (मागासवर्गीयांसाठी)

4. डोमिसाईल प्रमाणपत्र

5. उत्पन्नाचे प्रमाणपत्र

6. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र

7. अपंगत्वाचे प्रमाणपत्र

8. आधार क्रमांक

9. वर्किंग प्रोफेशनल्ससाठी अनुभव व नाहरकत प्रमाणपत्र

व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक नसले तरी पदवी अभ्यासक्रमासाठी अनिवार्य आहे. तसेच सैन्यदल कोटा किंवा अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेश घेणाऱ्यांसाठी संबंधित प्रमाणपत्रे आवश्यक आहेत. आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे वेळेत न मिळाल्यास त्यांचा प्रवेश खुल्या प्रवर्गातून होईल. तसेच, बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येणार असून, अशा उमेदवारांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा संचालनालयाने दिला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com