Sharad Pawar : "निवडणुकीत संघर्ष असतो पण..." शरद पवारांनी सांगितली ती महत्त्वाची गोष्ट
आज 1 नोव्हेंबरला मतदारयाद्यांमधील बोगस मतदार आणि मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेचा सत्याचा मोर्चा सुरु झाला असून या मोर्चाला राज ठाकरे, उद्धव ठाकरे तसेच कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार देखील सहभागी झाले आहेत.
यावेळी शरद पवार म्हणाले की, "तुम्ही सर्वांनी जबरदस्त एकजुट दाखवली... अशी अडचण 79 काळात आली होती. महाविद्यालयात शिकत असताना. संयुक्त मोर्चासाठी लोक आली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ होती. तशी आजची चळवळ.आजची एकजुट बघून संयुक्त महाराष्ट्राची आठवण झाली... संविधानाने दिलेला अधिकार जतन करुन ठेवण्याची वेळ आहे".
"सत्तेचा गैरवापर केला जातोय. आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत. राजकीय मतभेद विसरुन एक व्हवं लागेल. मतचोरीचा विषय हातात घेतला. निवडणूक झाल्या आणि नंतर हे समोर आले. विशेषतः विधानसभेच्या नंतर निकाल आले तेव्हा धक्का बसला. जाणकर यांनी त्यांच्या अनुभवानुसार सांगितले. निवडणुकीत संघर्ष असतो".
"पण या सगळ्या गोष्टी विसरून आपल्याला पुढे जावे लागेल. लोकशाहीचा अधिकार जिवंत ठेवण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. काही लोकांनी तक्रार केली. आरोप सिद्ध केला त्याच्यावर आरोप केला. शासन सर्व संरक्षण देत आहे. यशस्वी संसदीय आणि लोकशाही टिकवायची असेल तर एकत्र आले पाहिजे. आपण देशाची लोकशाही टिकेल कशी याची खबरदारी घेऊ. आपली सगळ्यांची रजा घेतो".

