Monsoon tips: पावसात भिजणं आवडतं? मग 'हे' 5 जबरदस्त आरोग्यदायी फायदे तुम्हाला नक्की ठाऊक असायला हवेत!
पावसाळ्यात भिजणं हे आरोग्यासाठी चांगले नाही असा समज आहे. पावसाच्या पाण्यांने सर्दी, खोकला असे अनेक आजार डोकंवर काढतात. पण याच पावसात भिजणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते. आम्ही या लेखात याबद्दल माहिती देणार आहोत.पावसाचं पाणी केवळ हवामान थंड करत नाही, तर शरीरासाठी एक नैसर्गिक औषध म्हणूनही काम करतं. अनेक संशोधन आणि आयुर्वेदानुसार पावसात भिजणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.
1. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय - पावसाचं थंडगार पाणी शरीरातील उष्णता कमी करतं. हे उच्च रक्तदाब, स्ट्रोक किंवा त्वचेच्या समस्या जसं की मुरुमं, फोड यांना दूर ठेवण्यास मदत करतं.
2. त्वचेसाठी नैसर्गिक क्लिन्झिंग - पावसात आंघोळ केल्याने त्वचेवरील मळ आणि मृत पेशी सहज निघून जातात. यामुळे त्वचा स्वच्छ, चमकदार आणि ताजी वाटते. पावसाचं पाणी त्वचेचं पीएच संतुलन राखतं.
3. मानसिक तणावात आराम -
पावसात भिजल्यावर एंडोर्फिन आणि सेरोटोनिन हे आनंददायक हार्मोन्स सक्रिय होतात, जे नैराश्य आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे मन प्रसन्न राहतं.
4. नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रिया - पावसात भिजल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. हे शरीरासाठी एक नैसर्गिक डिटॉक्सप्रमाणे कार्य करतं. पूर्वीचे आजी-आजोबा पावसात भिजायला सांगायचे, त्यामागे हीच विचारधारा होती.
5. किडनी सिस्ट व त्वचेच्या समस्यांपासून संरक्षण - उष्णतेमुळे होणाऱ्या किडनी सिस्टसारख्या समस्यांवर पावसाचं पाणी उपयोगी ठरतं. त्वचेवरील फोड, खाज यावरही याचा फायदा होतो.
पावसात भिजणं केवळ बालपणीचा आनंद नसून एक आरोग्यदायी सवय आहे. त्यामुळे या पावसाळ्यात स्वतःला मोकळं सोडा, टपटपणाऱ्या थेंबांत भिजा आणि आपल्या मुलांनाही हे अनुभवू द्या!
टीप- वरती दिलेली माहिती सामान्य ज्ञांनावर अवलंबून आहे.