होळीनिमित्त कोकणासाठी विशेष रेल्वेगाड्या, आरक्षण कधीपासून सुरु होणार?

होळीनिमित्त कोकणसाठी खास रेल्वे गाड्या
Published by :
Team Lokshahi

सध्या कोकणात होळी निमित्त मुंबईमधून अनेक चाकरमानी जाताना दिसतील. यामुळे मुंबईमधुन कोकणात जाणाऱ्यांची संख्यादेखील अधिक वाढताना दिसत आहे. यासाठी मध्य रेल्वे व कोकण रेल्वेने एक खास सुविधा देणार असल्याचे म्हंटले जात आहे.

होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरुन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये सीएसएमटी-मडगांव, एलटिटी मडगाव आशा अधिक रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांसाठी 24 फेब्रुवारीपासून आरक्षण सुरु होणार आहेत. तसेच 6 मार्चपासून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com