Kolhapur Crime News
Kolhapur Crime NewsKolhapur Crime News

Kolhapur Crime News : कोल्हापुरात दुचाकीस्वाराचा संताप! आधी एसटी चालकाला मारहाण नंतर शिवीगाळ, कारण काय जाणून घ्या..

कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील भाचरवाडी परिसरात एसटी बस चालक आणि वाहकावर करण्यात आलेल्या मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

(Kolhapur Crime News) : कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील भाचरवाडी परिसरात एसटी बस चालक आणि वाहकावर करण्यात आलेल्या मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मोटारसायकलस्वाराने अचानक संतापाच्या भरात काठीने बसचालकाला मारहाण केली आणि वाहकाला ढकलल्याचा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, भाचरवाडीतल्या अरुंद रस्त्यावर एसटी बस आणि शाळेची बस एकमेकांना वाट देण्यासाठी थांबल्या होत्या. दोन्ही चालकांमध्ये साधी चर्चा सुरू असताना मागून मोटारसायकलवर येणारा विनायक विष्णू रेडेकर हा अचानक चिडून दोघांवर ओरडू लागला. रस्ता अडवल्याचा आरोप करत त्याने संतापाच्या भरात एसटी चालकाला उधळण करत शिवीगाळ केली. “ही बोलण्याची वेळ-ठिकाण आहे का? इथला रस्ता तुझा खासगी आहे का?” अशा तोंडसुखात तो उतरल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.

काठीने मारहाण, वाहकाला ढकलणे

वाद वाढताच रेडेकरने हातातील काठीने एसटी चालकाच्या खांद्यावर जोरदार फटके मारले. त्याला शांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहक दिनकर पाटील यांनाही त्याने ढकलून दिल्याचे समोर आले आहे. सरकारी नोकरी बजावत असलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या या वागणुकीमुळे एसटी विभागात नाराजीचा सुर उमटला आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी बनवलेला व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. त्यातील दृश्यांमध्ये आरोपी काठीने मारहाण करताना स्पष्टपणे दिसतो. या प्रकरणी पन्हाळा पोलिसांनी विनायक रेडेकरविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

थोडक्यात

  • कोल्हापुरात दुचाकी चालकाकडून एसटी चालकाला मारहाण

  • शिवीगाळ करत वाहकाला केली धक्काबुक्की

  • पन्हाळा तालुक्यातील भाचरवाडी येथील घटना

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com