कोल्हापूर पोलिसांचा 'मै हु डॉन' गाण्यावर तुफान डान्स; पोलीस अधिकाऱ्यांना खांद्यावर घेऊन कर्मचारी नाचले

कोल्हापूर पोलिसांचा 'मै हु डॉन' गाण्यावर तुफान डान्स; पोलीस अधिकाऱ्यांना खांद्यावर घेऊन कर्मचारी नाचले

कोल्हापूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल २६ तासांनंतर संपलीय . महाद्वार रोड वरील मिरवणुकीतील भगतसिंग तरुण गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीची आरती जिल्हा प्रशासनाकडून केल्यावर ही मिरवणूक संपलीय.
Published by :
Siddhi Naringrekar

सतेज औंधकर, कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल २६ तासांनंतर संपली. महाद्वार रोड वरील मिरवणुकीतील भगतसिंग तरुण गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीची आरती जिल्हा प्रशासनाकडून केल्यावर ही मिरवणूक संपलीय. मिरवणूक संपताच कोल्हापूर पोलिसांनी भर पावसात तुफान डान्स केलाय. तब्बल १० दिवस डोळ्यात तेल घालून आणि अनंत चतुर्दशी दिवशी अहोरात्र २६ तास सुरू असणारी मिरवणूक निर्विघ्न पार पडल्या नंतर कोल्हापूर पोलिसांनी डॉल्बीच्या ठेक्यावर जल्लोष केलाय.

मैं हू डॉन... पुलिस वाला सायकल वाला... पुष्पा गाण्यावर तुफान डान्स केलाय. यावेळी ५०० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी थिरकले आहेत. पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण , उपअधीक्षक गोसावी ,पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी खांद्यावर घेवून भर पावसात डान्स केलाय.

यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनीही सर्व अधिकारी कर्मचारी यांचं टाळ्या वाजवत मनोबल वाढवलं तर उत्कृष्ट बंदोबस्त करून डान्स करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची गळाभेट घेत हस्तांदोलन केले

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com