Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखान्यासाठी विरोधी सतेज पाटील आघाडीकडून उमेदवार जाहीर
Admin

Rajaram Sakhar Karkhana : राजाराम साखर कारखान्यासाठी विरोधी सतेज पाटील आघाडीकडून उमेदवार जाहीर

राजाराम साखर कारखान्यासाठी विरोधी सतेज पाटील आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आली आहे.

राजाराम साखर कारखान्यासाठी विरोधी सतेज पाटील आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. विरोधी आघाडीमधील 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवल्यानंतर विरोधी गटाने प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे धाव घेतली होती. त्यामुळे आता 16 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. 

विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह पाच संचालकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. राजाराम कारखाना कार्यस्थळावर सत्तारुढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्तारुढ महाडिक गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले.

राजाराम साखर कारखान्याच्या विरोधी गटातील 29 अवैध उमेदवारांच्या याचिकेवरील निर्णय प्रादेशिक साखर सहसंचालकांनी दिलेला निकाल मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला. यानंतर राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com