कोल्हापूरकर ठरली ‘कौन बनेगा करोडपती १४’ ची पहिली ‘करोडपती’

कोल्हापूरकर ठरली ‘कौन बनेगा करोडपती १४’ ची पहिली ‘करोडपती’

‘कौन बनेगा करोडपती १४’ हा शो चांगलाच लोकप्रिय झाला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. दिवसेंदिवस या शोची लोकप्रियत वाढत चालली आहे.

‘कौन बनेगा करोडपती १४’ हा शो चांगलाच लोकप्रिय झाला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. दिवसेंदिवस या शोची लोकप्रियत वाढत चालली आहे. या ‘कौन बनेगा करोडपती १४’ शोला त्यांचा पहिला करोडपती स्पर्धक मिळाला आहे. कोल्हापूरमधील एका महिलेनं एक कोटीच्या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर देत एवढी रक्कम जिंकली आहे. गेल्या सीझनमध्ये अनेक महिला करोडपती झाल्या आहेत.

कोल्हापुरातील रहिवाशी असणाऱ्या कविता चावला या ४५ वर्षीय महिलेने एक कोटी रुपये जिंकले. कविता या ‘कौन बनेगा करोडपती शो’मध्ये पोहोचल्या होत्या, परंतु त्या हॉटसीटपर्यंत पोहोचू शकल्या नव्हत्या, पण त्यांनी हार मानली नाही आणि त्या जिद्दीने पुन्हा शोमध्ये परतल्या, हॉटसीटवर बसल्या आणि एक कोटी रुपये जिंकल्या. कविता करोडपती झाल्या तो एपिसोड येत्या सोमवार आणि मंगळवारी सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. मात्र, कविता यांनी ७ कोटी रुपये जिंकले की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Lokshahi
www.lokshahi.com