कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम

कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम

खा. सुनिल तटकरे यांनी आढावा बैठक बोलावली

निसार शेख|रत्नागिरी: कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम तसेच गुहागर-विजापूर मार्गाबाबत खा. सुनिल तटकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक बोलावली आहे. मंगळवार दि. १५ रोजी ही बैठक होणार आहे. दुपारी २ वाजता ही बैठक होणार असून याचवेळी खा. तटकरेंसह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा मतदार संघाचे आ. शेखर निकम, माजी आ. रमेशभाई कदम, माजी सभापती तथा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा चित्राताई चव्हाण, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयंत खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, शहराध्यक्ष मिलिंद कापडी आदी उपस्थित राहणार असून सर्वजण कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्ग तसेच गुहागर-विजापूर मार्गाबाबतच्या समस्या मांडणार आहेत.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com