Konkan Railway Time Table 2025 : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर!
Konkan Railway Time Table 2025 : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! Konkan Railway Time Table 2025 : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर!

Konkan Railway Time Table 2025 : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! Advance Booking उद्यापासून सुरु

कोकण रेल्वे गणेशोत्सव: उद्यापासून आरक्षण सुरू, प्रवाशांसाठी २५० स्पेशल गाड्या.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Konkan Railway Time Table : कोकणवासियांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. कोकणातला सगळ्यात मोठा प्रतिष्ठित सण म्हणजे गणेशोत्सव आहे. या गणेशोत्सवासाठी मुंबईहून लाखोंच्या संख्येने लोक आपल्या मूळगावी कोकणात जात असतात. यापार्श्वभूमीवर कोकणातील रेल्वे गाड्यांचे आरक्षण उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे.

मागीलवर्षीच्या मानाने यंदा गणपती बाप्पाचे आगमन लवकर म्हणजे 27 ऑगस्टला होणार आहे. याच अनुषंगाने प्रवाशांना वेळेवर गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यासाठी कोकणात पोहोचता यावे, यासाठी कोकण रेल्वेने उद्यापासून स्पेशल गाड्यांचे आणि त्याचबरोबर नियमित गाड्यांचे आरक्षण सुरू केले आहे. कोकण रेल्वे पावसाळी वेळापत्रकामध्ये आवश्यक ते बदल करून ही सेवा प्रवाशांना उपलब्ध करून देणार आहे.

परिणामी कोकणात जाण्यासाठी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या तुलनेने जास्त असते. याच गोष्टी लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे रेल्वे प्रशासनाने गणपती स्पेशल ज्यादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सोयीस्कररित्या प्रवास करता यावा यासाठी गणपतीविशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यंदाही गणपतीस्पेशल २५० ज्यादा गाड्या सोडण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कोकणातील रेल्वे गाड्यांचे आरक्षणाचे वेळापत्रक

प्रवास तारीख ---आरक्षण खुले होण्याची तारीख

शुक्रवार, २२ ऑगस्ट ---सोमवार, २३ जून

शनिवार, २३ ऑगस्ट ---मंगळवार,२४ जून

रविवार, २४ ऑगस्ट ---बुधवार, २५ जून

सोमवार, २५ ऑगस्ट ---गुरुवार, २६ जून

मंगळवार, २६ ऑगस्ट ---शुक्रवार, २७ जून

बुधवार, २७ ऑगस्ट ---शनिवार, २८ जून

गुरुवार, २८ ऑगस्ट ---रविवार, २९ जून

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com