कोकणात महाविकास आघाडीला धक्का; भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय

कोकणात महाविकास आघाडीला धक्का; भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय

राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा आज निकाल लागला आहे.

राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा आज निकाल आहे. अमरावती आणि नाशिक पदवीधर आणि नागपूर, कोकण आणि मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत पहिला निकाल हाती आला असून कोकणात महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कोकणात भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत बाळाराम म्हात्रे यांना 20800 मते मिळाली. तर शेकापचे बाळाराम पाटील यांना 9500 मते मिळाली. मविआच्या बाळाराम पाटील यांचा पराभव त्यांनी केला आहे.

याच पार्श्वभूमीवर विजय मिळवल्यानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, माझा विजय हा सर्व शिक्षकांचा आहे. माझ्यावरील विश्वास सार्थ ठरवला. शिक्षकांच्या पेन्शंनचा प्रश्न सोडवणार असल्याचे भाजपाच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com