Pune Koyta Gang : आता पोलिसही असुरक्षित! टोळीला पकडायला गेलेल्या API वर कोयता गँगचा जीवघेणा हल्ला

Pune Koyta Gang : आता पोलिसही असुरक्षित! टोळीला पकडायला गेलेल्या API वर कोयता गँगचा जीवघेणा हल्ला

पुण्यात पुन्हा कोयता गँगने धुमाकळू घालत दहशत माजवली आहे. पोलिसांनी केलेल्या विविध कारावयांनंतरही यामध्ये कोणताही बदल होताना दिसत नाही.
Published by :
shweta walge
Published on

पुण्यात पुन्हा कोयता गँगने धुमाकळू घालत दहशत माजवली आहे. पोलिसांनी केलेल्या विविध कारावयांनंतरही यामध्ये कोणताही बदल होताना दिसत नाही. अशातच अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोयता गँगने सहाय्यक पोलीस निरिक्षकावरच कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत. रत्नदीप गायकवाड असे हल्ल्यात जखमी जालेल्या सहाय्यक पोलीस निरिक्षकाचं नाव आहे.

पुण्यातील रामटेकडी परिसरात कोयता गँगच्या गुंडांना पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गेले होते. या गुंडाना पकडत असतानाच त्यांच्यावर कोयता गँगने हल्ला केला, त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव रत्नदीप गायकवाड असून, त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसला आहे. त्यांना उपचारासाठी आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com