Admin
बातम्या
आर्यन खान प्रकरणात वानखेडेंचा शाहरुखसोबत 18 कोटींचा सौदा; क्रांती रेडकर हिने सांगितले...
आर्यन खान प्रकरणी एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे अडचणी वाढताना दिसत आहेत.
आर्यन खान प्रकरणी एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे अडचणी वाढताना दिसत आहेत. सीबीआयने समीर वानखेडे यांच्याविरुध्द एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला गोवण्यात न येण्याच्या बदल्यात 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडेंवर ठेवण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर वानखेडेंची पत्नी म्हणजेच अभिनेत्री क्रांती रेडकर हिने प्रतिक्रिया दिली आहे. क्रांती रेडकर म्हणाली की, हे फक्त आरोप आहेत आणि आम्ही सीबीआयच्या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत आहोत. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्यांच्याविरोधातील सर्व आरोप खोटे आहेत, हे प्रत्येकाला माहित आहे. असे क्रांती रेडकर म्हणाली.