Kunal Kamra : कुणाल कामराच्या अडचणीत वाढ, पोलीस निवासस्थानी दाखल, नक्की काय घडलं?

Kunal Kamra : कुणाल कामराच्या अडचणीत वाढ, पोलीस निवासस्थानी दाखल, नक्की काय घडलं?

मुंबईतील खार पोलिसांनी कुणाल कामरा याला चौकशीसाठी समन्स बजावला आहे.
Published by :
Shamal Sawant
Published on

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा गेले काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाणं सादर केल्यानंतर तो चांगलाच अडचणीत सापडला. कुणालला अटक करण्याची मागणीदेखील केली गेली. त्यानंतर लगेचच कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्याचा अंतरिम अटकपूर्व जामीनाचा अर्ज मंजूर केला . अशातच आता मुंबईतील खार पोलिसांनी कुणाल कामरा याला चौकशीसाठी समन्स बजावला आहे.

आता मुंबईत त्याच्याविरोधात तीन नवे गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबई पोलिस या गुन्ह्यांप्रकरणी त्याला अटक करू शकतात. मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश या तीन नव्या एफआरआरवर लागू होणार नाही.कुणाल कामरा याला यापूर्वी देखील समन्स बजावण्यात आलं होतं. तेव्हा त्याने सात दिवसांचा अवधी मागितला होता. आता त्याला दुसऱ्यांदा समन्स धाडण्यात आलं आहे.

दुसऱ्या समन्सला कुणाल कामरा हजर न राहिल्याने पोलीस त्याच्या घरी पोचहोले. कुणाल कामरा मुंबईत आहे की नाही याबाबत माहितीदेखील घेतली. कुणाल कामरा आमच्याही संपर्कात नसल्याची वडिलांनी दिली पोलिसाना माहिती दिली. चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे दुसरे समन्स पोलिसानी कामराला बजावले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com