Ladki Bahin Yojana E- KYC Process: लाडक्या बहिणींनो, तुमची E-KYC झाली का? उरले फक्त 12 दिवस, स्टेप वाचा प्रक्रिया आजच पूर्ण करा
Ladki Bahin Yojana E- KYC Process : राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ओळख पडताळणी (KYC) करणे बंधनकारक केले आहे. जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर योजनेचा पुढील आर्थिक लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी केवायसी करणे आवश्यक आहे. केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 असून, त्याआधी ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
केवायसीसाठी वेळ मर्यादित
राज्यात अनेक महिलांनी आधीच केवायसी पूर्ण केली आहे. मात्र, अजूनही काही लाभार्थ्यांची प्रक्रिया बाकी आहे. कधी वेबसाइट अडचण दाखवते, तर कधी ओटीपी येत नाही, अशा कारणांमुळे विलंब होतो. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता, लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी. सध्या केवायसीसाठी केवळ काही दिवसच शिल्लक आहेत.
लाडकी बहीण योजनेची केवायसी कशी कराल?
सर्वप्रथम[https://ladakibahin.maharashtra.gov.in/](https://ladakibahin.maharashtra.gov.in/)** या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
मुख्य पानावर केवायसीसाठी दिलेल्या पर्यायावर क्लिक करा.
नवीन पान उघडल्यानंतर आधार क्रमांक आणि दिलेला कॅप्चा भरा.
त्यानंतर दिसणाऱ्या अर्जामध्ये तुमची माहिती नीट तपासा व भरा.
पुढील टप्प्यात पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकून त्यांची माहिती द्यावी लागेल.
काही सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि घोषणापत्र स्वीकारा.
शेवटी अर्ज सबमिट करा.

