Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार की नाही, फडणवीस म्हणाले...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार की नाही, फडणवीस म्हणाले...

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर बंद होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विरोधकांच्या आरोपाला थेट उत्तर दिले.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • मुख्यमंत्र्यांचा लाडक्या बहिणींना मोठा दिलासा

  • १० लाखांहून अधिक महिला अर्जांची छाननी

  • शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे पॅकेज!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर बंद होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विरोधकांच्या आरोपाला थेट उत्तर दिले. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, लाडक्या बहिणींना असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला आहे.

जुलै २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीआधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्यानंतर २ कोटी ६२ लाख महिलांनी अर्ज केले. १० लाखांहून अधिक महिला अर्जांची छाननी प्रक्रिया केली असता विविध कारणांमुळे अपात्र ठरल्या. त्यामुळे सद्यस्थितीत २ कोटी ४७ लाख पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात प्रति लाभार्थी १५०० रुपये जमा होत आहेत. मात्र आगामी निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे.

महायुती सरकारने जाहीर केलेल्या कुठल्याही योजना बंद करायच्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार अशी ओरड विरोधक करत असले तरी ही योजना बंद होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. पाच वर्षांनी आमचे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिन्यू केले तर अजून पाच वर्षांपर्यंत तुम्हाला सवलत देऊ, असेही ते म्हणाले. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. फलटण येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे पॅकेज!

आपले महायुतीचे सरकार आहे, ते विकासाचा विचार करणारे सरकार आहे. आम्हाला समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास हवाय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आणि मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे, असे फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com