लौट के तुझको आना हैं! लालबागच्या राजाचं साश्रूनयनांनी विसर्जन
Admin

लौट के तुझको आना हैं! लालबागच्या राजाचं साश्रूनयनांनी विसर्जन

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. मुंबई तब्बल 22 तासानंतर देखील विसर्जन मिरवणूक सुरूच होती.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. मुंबई तब्बल 22 तासानंतर देखील विसर्जन मिरवणूक सुरूच होती. लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला होता. लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा पार पडला. गिरगाव चौपाटीवर लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला. समुद्राचं पाणी अंगावर उडवत आणि बोटींच्या माध्यमातून लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.

खास सजावट करण्यात आलेल्या तराफ्यावरून लालबागच्या राजाला खोल समुद्रात विजर्जनासाठी नेण्यात आले. खोल समुद्रात बाप्पाला निरोप देण्यात आला. भरल्या डोळ्यांनी भक्तांनी आपल्या लाडक्या लालबागच्या राजाला निरोप दिला. दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पानं भक्तांचा निरोप घेतला. लालबागच्या राजाला साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी भक्तांची अलोट गर्दी होती. गिरगाव चौपाटीवर अनेक गणपतींचं विसर्जन पार पडलं

Lokshahi
www.lokshahi.com