लालबागचा राजा गिरगाव चौपटीवर दाखल, निरोपासाठी जनसागर उसळला

लालबागचा राजा गिरगाव चौपटीवर दाखल, निरोपासाठी जनसागर उसळला

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मोठ मोठ्या गणपतींचे आगमन अगदी थाटामाटात झाले. १० दिवस सर्वजण मनोभावे बाप्पाची सेवा करून अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. मुंबई तब्बल 22 तासानंतर देखील विसर्जन मिरवणूक सुरूच आहे. लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला आहे. थोड्याचवेळात विसर्जन होईल. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांनी गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी केली आहे.

लालबागच्या राजाला निरोप देण्याच्या आधी त्याची आरती सुरु आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जनसागर लोटला आहे. थोड्याच वेळात आता लालबागच्या राजाचे विसर्जन होणार आहे.

Lokshahi
www.lokshahi.com