Learn these healthy tips to stay healthy even after fifty
Learn these healthy tips to stay healthy even after fifty

Health Tips in Marathi : पन्नाशीनंतरही निरोगी राहण्यासाठी जाणून घ्या 'या' हेल्दी टिप्स

वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर शरीरात काही बदल होणं स्वाभाविक आहे. पचनक्रिया पूर्वीसारखी राहत नाही, हाडे-स्नायू कमकुवत होऊ लागतात आणि विविध आजारांचा धोका वाढतो.
Published by :
Riddhi Vanne

वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर शरीरात काही बदल होणं स्वाभाविक आहे. पचनक्रिया पूर्वीसारखी राहत नाही, हाडे-स्नायू कमकुवत होऊ लागतात आणि विविध आजारांचा धोका वाढतो. मात्र, योग्य जीवनशैली आणि काही निरोगी सवयी अंगीकारल्यास उतारवयातही तुम्ही सक्रिय, उत्साही आणि निरोगी राहू शकता. पन्नाशीनंतर आरोग्यदायी सवयी पाळणाऱ्या व्यक्तींमध्ये गंभीर आजारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी आढळते.

1. आहारावर द्या विशेष लक्ष

आपण रोज खात असलेले अन्न आपल्या आरोग्याचा पाया असतो. तज्ज्ञांच्या मते, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचे मूळ कारण चुकीचा आहार आहे.

  • पन्नाशीनंतर शरीराला कमी ऊर्जा लागते, पण पोषणाची गरज वाढते.

  • ताज्या भाज्या, फळे, डाळी, धान्य आहारात समाविष्ट करा.

  • जास्त साखर, मीठ, तळलेले व प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा.

  • घरचं, हलकं आणि संतुलित अन्न खाण्याची सवय लावा.

2. वजन नियंत्रणात ठेवा

वाढलेलं वजन म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण. लठ्ठपणामुळे—

  • हृदयरोग

  • मधुमेह

  • उच्च रक्तदाब

  • श्वसनाचे विकार

  • कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

    म्हणून पन्नाशीनंतर बीएमआय (BMI) योग्य मर्यादेत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.

3. नियमित व्यायाम करा.

या वयात शरीर हालचालींपासून दूर ठेवणं धोक्याचं ठरू शकतं. दररोज थोडाफार व्यायाम केल्यास—

  1. वजन संतुलित राहतं.

  2. शरीरात ऊर्जा टिकून राहते.

  3. पचनशक्ती सुधारते.

  4. हाडे आणि स्नायू मजबूत राहतात.

जड व्यायाम नको, पण वॉकिंग, सायकलिंग, सूर्यनमस्कार, योगासने यांचा मोठा फायदा होतो. योगामुळे मानसिक शांतताही मिळते.

4. नियमित आरोग्य तपासणी करा..

उतारवयात आजार वेळेवर ओळखणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे—

  • रक्तदाब

  • रक्तातील साखर

  • कोलेस्ट्रॉल

  • डोळ्यांची तपासणी

या तपासण्या ठराविक काळाने करून घ्या. यामुळे संभाव्य आजार वेळेत लक्षात येतात आणि उपचार सोपे होतात.

5. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष नको...

शारीरिक आरोग्यासोबत मानसिक स्वास्थ्यही तितकंच महत्त्वाचं आहे. निवृत्तीनंतर किंवा जबाबदाऱ्या कमी झाल्यावर एकटेपणा जाणवू शकतो. यासाठी—

  • आवडते छंद जोपासा

  • मित्र-मैत्रिणींशी संवाद ठेवा

  • ध्यान, प्राणायाम करा

धूम्रपान आणि मद्यपानासारख्या अपायकारक सवयी टाळा

6. झोप आणि पाणी याकडेही लक्ष द्या

पन्नाशीनंतर अनेकांना झोपेच्या समस्या जाणवतात. पण शरीरासाठी दररोज ७–८ तासांची शांत झोप आवश्यक आहे.

  • झोपण्याआधी मोबाईल/टीव्हीचा वापर कमी करा

  • दिवसातून किमान ८–१० ग्लास पाणी प्या

  • यामुळे किडनी, पचनसंस्था आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com