मंत्री संजय राठोड यांचं कार्यालय म्हणजे ‘मंत्रालय नसून भ्रष्टालय’ महाराष्ट्र स्टेट ड्रगिस्ट असोसिएशनचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र
Admin

मंत्री संजय राठोड यांचं कार्यालय म्हणजे ‘मंत्रालय नसून भ्रष्टालय’ महाराष्ट्र स्टेट ड्रगिस्ट असोसिएशनचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

महाराष्ट्र स्टेट ड्रगिस्ट असोसिएशनचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिले आहे.

महाराष्ट्र स्टेट ड्रगिस्ट असोसिएशनचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिले आहे. या पत्राची आता चर्चा रंगली आहे. मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार रोखा. मंत्री संजय राठोड यांचं कार्यालय म्हणजे ‘मंत्रालय नसून भ्रष्टालय’ आहे. असा उल्लेख करत महाराष्ट्र स्टेट ड्रगिस्ट असोसिएशनचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहिले आहे.

महाराष्ट्रातील सर्व औषध दुकानदार हे या संघटनेशी निगडित आहेत. या संघटनेने मंत्री संजय राठोड यांच्यावर असा आरोप केला आहे. त्री संजय राठोड यांच्या कार्यालयात होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात योग्य कारवाई झाली नाही, तर आंदोलन करण्याचा इशारादेखील या पत्राद्वारे देण्यात आला आहे.

अनेक सभासदांना नाहक शिक्षा भोगावी लागत असल्याचा आरोप या पत्राद्वारे करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातील औषध विक्रेते अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराने त्रस्त आणि तणावग्रस्त झाले आहेत. असे या पत्रात लिहिले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com