निखिल मेश्राम हत्येप्रकरणी सात आरोपींना जन्मठेप
Admin

निखिल मेश्राम हत्येप्रकरणी सात आरोपींना जन्मठेप

नागपूर येथील निखील मेश्राम हत्याकांड प्रकरणी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता झाली तर ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

नागपूर येथील निखील मेश्राम हत्याकांड प्रकरणी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता झाली तर ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने 12 आरोपींपैकी सात जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर पुरव्यांअभावी पाच आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली होती.

2018 मधील हे प्रकरण आहे. प्रेम प्रकरणात उद्भवलेल्या वादातून आरोपींनी प्रियकराचा भाऊ निखिल मेश्राम याची हत्या केली होती. किरण ऊर्फ विक्की मेश्राम याचे आरोपीच्या कुटुंबातील मुलीसोबत प्रेमसंबंध होते. याचा आरोपींच्या कुटुंबीयांमध्ये राग होता. याच वादातून घटनेच्या एक दिवस आधी म्हणजेच 19 मे 2018 रोजी आरोपींनी किरण मेश्रामसह त्याच्या आईला मारहाण करुन जखमी केले. यानंतर किरणने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींनी किरण आणि त्याचा भाऊ निखिल मेश्राम यांच्यावर दबाव टाकला होता. परंतु किरण मेश्रामने तक्रार मागे घेण्यासाठी नकार दिल्याचा राग आरोपींच्या मनात होता. 20 मे 2018 रोजी किरण आणि निखिल घरासमोर बसलेले असताना आरोपी तिथे आले. त्यांनी किरण आणि निखिलच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर लाठ्या, विटा, दगड, लोखंडी रॉड, कुऱ्हाडीने हल्ला करुन दोघांनाही जखमी केले. यात निखिलच्या डोक्याला जबर मार बसला. त्याला मेयो रुग्णालयात दाखल केलं असतान डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं.

या प्रकरणात एका महिलेसह १२ आरोपींवर खटला चालविण्यात आला. यातील सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. एकावेळी सात आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com