ठाकरे गटाच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

ठाकरे गटाच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

ठाकरे गटाकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या ४० स्टार प्रचारकांची नावं समोर आली आहेत. या स्टार प्रचारकांमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, आमदार अँड. अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,

सचिव आदेश बांदेकर, शिवसेना व युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, लक्ष्मण वडले, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे, संजय जाधव, किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे

तसेच संजना घाडी, शीतल शेठ-देवरुखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, सुभाष वानखेडे आणि प्रियंका जोशी यांचा या यादीमध्ये समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com