Rahul Gandhi Bharat Jodo Yatra in MaharashtraTeam Lokshahi
ताज्या बातम्या
वाशिमच्या त्या चिमुकलीला राहूल गांधींची भेट घ्यायची आहे... व्हिडीओ होतोय सोशल मिडीयावर व्हायरल
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. ते येत्या १५ व १६ रोजी वाशिम जिल्ह्यात असणार आहेत.
गोपाल व्यास, वाशिम
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. ते येत्या १५ व १६ रोजी वाशिम जिल्ह्यात असणार आहेत. त्याच निमित्ताने वाशिमच्या ७ वर्षीय चिमुकलीला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. त्या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हाईरल होतोय. वाशिमच्या ह्या चिमुकलीचं नाव आहे शाश्वती इंगोले, ती दुसऱ्या वर्गात शिकते. राहुल गांधी आता तिला भेट देतील का आणि ती नेमके काय प्रश्न विचारणार याविषयी सर्वांच्याच मनात कुतुलह निर्माण झालं आहे.