ST Bus Live Location App : आता प्रवाशांना समजणार एसटी बसचे लाईव्ह लोकेशन; 15 ऑगस्टपासून नवीन ॲपची सुरुवात

ST Bus Live Location App : आता प्रवाशांना समजणार एसटी बसचे लाईव्ह लोकेशन; 15 ऑगस्टपासून नवीन ॲपची सुरुवात

येत्या 15 ऑगस्टपासून एसटी ॲपची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
Published by :
Team Lokshahi
Published on

राज्यात महिलांना एसटी बसच्या तिकिटांमध्ये 50 टक्के आरक्षण दिल्यानंतर आणि एसटी बसचे भाडेवाढही कमी केल्यानंतर राज्यात एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र हा प्रवास करत असताना प्रवशांना बऱ्याच वेळेला तासनतास बसच्या येण्याची वाट पाहावी लागते. त्यामध्ये प्रवाशांचा बराच वेळ वाया जातो. यावर उपाय म्हणून येत्या 15 ऑगस्टपासून एसटी ॲपची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. यामध्ये आपल्याला एसटीचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक करता येणार असल्यामुळे प्रवाशांना आता बसच्या येण्याची वाट बघत उभे राहावे लागणार नाही.

या ॲपसंदर्भात परिवहन मंडळाने एक अधिकृत श्वेतपत्रिका जाहीर केली असून एसटी बसचे लाईव्ह लोकेशन प्रवाशांना या ॲपद्वारे प्राप्त होणार आहे. यासाठी राज्यातील एसटीमध्ये जीपीएस बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून आतापर्यंत 12 हजार एसटी बसेसमध्ये जीपीएस बसवले गेले आहेत. एसटी अर्थात सर्वांची आवडती लालपरी याचे प्रवाशांनी तिकीट काढल्यानंतर त्यावर असलेल्या ट्रीपकोडद्वारे आपल्याला आपल्या बसचे लाईव्ह लोकेशन दिसणार आहे. त्यासोबतच त्या आणि इतर बसेसचे थांबे त्यांचे मार्ग आणि आपली बस आपल्या स्टॅन्डला कधी येणार या सर्वांची माहिती आपल्याला आपल्या फोनवर या बसच्या अॅपद्वारे मिळणार आहे. यासाठी एसटीच्या मुंबई सेंट्रल येथे असलेल्या मध्यवर्ती कार्यालयात नवीन अद्ययावत नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.

अशा प्रकारचे ॲप तयार करून एसटी बसेसला जीपीएस बसवण्याचे काम 2019 मध्ये कोविड काळात तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एका खासगी कंत्राटदाराला दिले होते. मात्र ते काम तेव्हा पूर्ण होऊ शकले नाही. पण आता ते काम पूर्णत्वास आले असून 15 ऑगस्टला एसटी बसच्या ॲपची सुरुवात होणार आहे. याचा मोठा फायदा एसटी प्रवाशांना होणार असून लाईव्ह लोकेशनच्या सुविधेमुळे लोकांचा वेळही वाचणार आहे. तसेच आपली बस आता कोणत्या मार्गावर आहे, किती वेळात आपल्या स्टॅन्डला पोहोचणार आहे, याची अचूक माहिती प्रवाशांना मिळणार आहे.

हेही वाचा

ST Bus Live Location App : आता प्रवाशांना समजणार एसटी बसचे लाईव्ह लोकेशन; 15 ऑगस्टपासून नवीन ॲपची सुरुवात
Cabinet Decision Today 2025 : शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी; फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचे 8 मोठे निर्णय कोणते?
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com